
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाला शौर्य, शिस्त आणि सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी जय्य्त तयारी सुरू आहे. यावर्षीची 77 व्या प्रजासत्ताक दिनाची परेड अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. ‘वंदे मातरम’चे 150 वे वर्ष आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित ही परेड असणार आहे.
कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हिंदूस्थानने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतरची ही पहिली भव्य परेड असणार आहे. या मोहिमेत हिंदूस्थानी सैन्याने सीमेपलीकडील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करून आपली ताकद दाखवून दिली होती. या पराक्रमाची झलक यंदाच्या परेडमध्ये पाहायला मिळेल. यावेळी पहिल्यांदाच ‘फेज्ड बॅटल एरे फॉर्मेशन’द्वारे युद्धाच्या मैदानात शस्त्रे आणि सैन्य ज्या क्रमाने तैनात केले जातात, त्याच पद्धतीने त्यांचे प्रदर्शन केले जाईल. या परेडमध्ये वापरली जाणारी काही मुख शस्त्रे आणि त्यांच्या प्रणालींबद्दल माहिती पुढीलप्रमाणे असेल-
ब्रह्मोस क्षेपणास्त्र
ब्रह्मोस हे हिंदुस्थान-रशियाने संयुक्त सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळावर हल्ला करण्यासाठी याचा वापर केला होता. हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. या क्षेपणास्त्राचे मॉडेल किंवा लाँचर परेडमध्ये प्रदर्शित केले जाईल.

रेंज: 300 किमी
वेग:ध्वनीच्या वेगाच्या 3 पट जास्त
वैशिष्ट्ये: रॅमजेट इंजिन, फायर-एंड-फॉरगेट
अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS)
DRDO, टाटा, महिंद्रा आणि हिंदुस्थान फोर्स यांनी संयुक्तपणे तयार केलेली ही 155 मिमी/52 कॅलिबर तोफ आहे.

रेंज: 48 किमी
वैशिष्ट्ये- कोणत्याही भागात सुरक्षितपणे जाऊ शकते. पोखरणमध्ये याची चाचणी करण्यात आली आहे.
दीड वर्षात या तोफेचा सैन्यात समावेश केला जाईल. अशा एकूण 1500 तोफा सेवेत असतील. ती परेडमध्ये प्रदर्शित केली जाईल.
मीडियम रेंज सर्फेस टू एयर मिसाइल (MR-SAM)
ही हिंदुस्थानी लष्कराची नवीन ड्रोन प्रणाली आहे. याचा वापर युद्धात ड्रोन नियंत्रित आणि दुरुस्त करण्यासाठी केला जातो. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ड्रोनने शेकडो पाकिस्तानी हवाई हल्ले हाणून पाडले. परेडमध्ये ड्रोन प्रणाली प्रदर्शित केली जाईल.

आकाश मिसाइल सिस्टम
हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान याने पाकिस्तानी हवाई हल्ले रोखले आणि अनेक क्षेपणास्त्रे नष्ट करण्यास मदत केली.

रेंज: अंदाजे 27-30 किमी
वैशिष्ट्य: एकाच वेळी अनेक विमानं, क्षेपणास्त्र, ड्रोन यांच्यावर हल्ला करू शकतो.
रोबोटिक खेचर
कुत्र्यासारखे दिसणारे रोबोट अत्यंत चपळ आणि तितकेच धोकादायक असतात. शत्रू आढळताच ते हल्ला करू शकतात. ते साहित्य वाहून नेऊ शकतात, डोंगराळ प्रदेशातही त्याचा वापर केला जाऊ शकतो. परेड रिहर्सलमध्ये याची एक झलक दाखवण्यात आली होती. हे रोबोट्स भविष्यातील युद्धांमध्ये सैनिकांचे प्राण वाचवतील.


























































