कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित

कर्नाटकमध्ये पोलीस महासंचालक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी के. रामचंद्र राव यांचे अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. रामचंद्र राव यांचे स्कँडल समोर आल्यानंतर आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

के. रामचंद्र राव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते अनेक महिलांसोबत अश्लील चाळे करताना दिसले. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करू, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज के. रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आले आहे.