कर्तव्य पथवरील परेडसाठी 10 हजार जणांना निमंत्रण

77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर आयोजित केलेल्या परेडसाठी 10 हजार जणांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. हे सर्व जण देशातील विविध भागांतून दिल्लीत येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्र निर्माणात ज्यांचे योगदान आहे, त्यांचा सन्मान करणे आणि राष्ट्रीय महत्त्व आयोजनात लोकांची भागीदारी वाढवण्यासाठी 10 हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुण्यासाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक, पंतप्रधान संग्रहालय आणि दिल्लीच्या अन्य प्रमुख स्थानांवर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.