लंडनमध्ये 8 वर्षीय हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव

लंडनमध्ये हिंदू असलेल्या एका 8 वर्षीय विद्यार्थ्यासोबत धार्मिक भेदभाव झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लंडनमधील एका प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या या मुलाने कपाळावर गंध लावला होता. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाने सुट्टीच्या वेळी मुलावर लक्ष ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकाराने मुलाला प्रचंड धक्का बसला आहे. गंध लावल्यानंतर शाळा प्रशासनाने मुलाकडील शाळेच्या जबाबदाऱ्याही काढून घेतल्या. मुलाच्या पालकांनी आणि काही हिंदू नागरिकांना मुख्याध्यापकाला हिंदू धर्मात गंध लावण्याचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु शाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. धार्मिक भेदभावामुळे चार मुलांवर ही शाळा सोडण्याची वेळ आली आहे.