
एसबीआयने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका देण्याचे ठरवले आहे. ऑनलाईनद्वारे तत्काळ पैसे पाठवण्यासाठी आता येत्या 15 फेब्रुवारीपासून एसबीआय ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे. एसबीआयने याआधीच एटीएममधून पैसे काढणे महाग केले आहे. आता बँकेने ग्राहकांना दुसरा झटका दिला आहे. इमिजिएट पेमेंट सर्व्हिसअंतर्गत पैसे पाठवणाऱ्या ग्राहकांना 25 हजारांपेक्षा जास्त पैसे पाठवल्यास दोन रुपये प्लस जीएसटी द्यावा लागणार आहे. याआधी यासाठी कोणताही चार्ज आकारला जात नव्हता. एक लाख ते दोन लाख रुपये पाठवल्यास सहा रुपये प्लस जीएसटी, दोन लाख ते पाच लाख रुपये पाठवल्यास 10 रुपये प्लस जीएसटी द्यावा लागणार आहे.





























































