दररोज मेकअप करणे आपल्या त्वचेसाठी कसे धोकादायक ठरते, वाचा

आजकाल, मेकअप अनेकांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनला आहे. विशेषतः महिलांना मेकअपचे खूप वेड लागले आहे. चांगला मेकअप केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच वाढवत नाही तर, सुंदर लूक देखील देतो. दररोज मेकअप करणे हे अजिबात सोपे काम नाही. झोपण्यापूर्वी मेकअप योग्यरित्या काढणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात चेहऱ्यासाठी कोणते मास्क गरजेचे आहेत, जाणून घ्या

मेकअप उत्पादनांमध्ये अशी रसायने असतात जी, त्वचेच्या नैसर्गिक संरक्षणात्मक थराला नुकसान पोहोचवू शकतात. मेकअप उत्पादनांमध्ये वापरले जाणारे अल्कोहोल, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि सुगंध यांसारखे घटक त्वचा कोरडी आणि संवेदनशील बनवू शकतात. मेकअप, धूळ आणि प्रदूषणासह, त्वचेला चिकटतो तेव्हा ते छिद्रांना बंद करते, ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे मुरुमे, जळजळ आणि पुरळ येण्याचा धोका वाढतो.

हिवाळ्यातील खोकल्यावर लिंबू आहे रामबाण उपाय, जाणून घ्या

दररोज मेकअप करणे म्हणजे अकाली वृद्धत्वाला आमंत्रण देणे आहे. मेकअप लावून झोपल्याने त्वचेची नैसर्गिक प्रक्रिया बिघडू लागते. यामुळे आपल्या त्वचेचे कोलेजन कमी होते. त्यामुळेच कमी वयामध्येच सुरकुत्या दिसून येतात.

जास्त मेकअपमुळे त्वचेवर कोरडेपणा दिसून येतो. तसेच काही कॉस्मेटिक उत्पादने त्वचेत जळजळ निर्माण करतात. यामुळे मेलेनिनचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे काळे डाग येतात. म्हणूनच मुरुमांनंतर राहिलेले काळे डाग जास्त काळ टिकतात. ज्याला पोस्ट-इंफ्लेमेटरी हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. जास्त मेकअपमुळे मुरुमे देखील वाढू शकतात. जर तुमची त्वचा तेलकट किंवा मुरुम-प्रवण असेल तर तुम्ही मेकअप टाळावा.

हिवाळ्यात चेहऱ्यासाठी कोणते मास्क गरजेचे आहेत, जाणून घ्या