मेथीदाणे केसांच्या पोषणासाठी कशाप्रकारे उपयुक्त ठरतात, जाणून घ्या

हिवाळ्यामध्ये आपली त्वचा रुक्ष झाल्याने, कोंडा वाढण्यास सुरुवात होते. हिवाळ्यामध्ये केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण खूप वाढते. केसात होणारा कोंडा ही समस्या आता साधी राहिली नाही. केसात कोंडा झाल्यामुळे, आपले केस गळण्यास सुरुवात होते. कोंड्यामुळे केसांचा पोतही बिघडतो. आपल्यापैकी प्रत्येकीला काळेभोर केस हवे असतात. परंतु काळ्याभोर लांबसडक केसांसाठी आपल्या डोक्याला नियमितपणे मालिश करणे खूप गरजेचे आहे. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी मेथीदाणे हे खूप फायद्याचे आहेत. केसांमधील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी मेथी प्रभावी आहे. यासोबतच मेथी केसांची चमक वाढवण्यासही मदत करते.

हिवाळ्यातील खोकल्यावर लिंबू आहे रामबाण उपाय, जाणून घ्या

मेथीचे दाणे आणि नारळाचे तेल हे मिश्रण केसांमध्ये जादुई फरक आणते आणि केसांना आणि टाळूला पोषण देते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेथी आणि खोबरेल तेल केसांना लावल्याने केसांची वाढ वाढते. यामुळे केस लांबसडक आणि सुंदर होतात, तसेच केसांना खोबरेल तेल-मेथी लावण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

2 चमचे मेथीचे दाणे आणि मूठभर कढीपत्ता 100 मिली नारळाच्या तेलात 10-15 मिनिटे उकळवा. नंतर हे तेल थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तेल गाळून बाटलीत भरा. शॅम्पू करण्यापूर्वी तुम्ही हे तेल तुमच्या टाळूला मसाज करण्यासाठी वापरू शकता.

देशी तूप हे आपल्या चेहऱ्यासाठी कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या

केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी, नारळाचे तेल आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले हे तेल लावू शकता. हे तुमच्या टाळूला देखील पोषण देते. पोषण मिळाल्याने केस मऊ आणि रेशमी होतात आणि केसांची ताकदही वाढते.

नारळाच्या तेलात लॉरिक अ‍ॅसिड असते हे केसांच्या मुळांसाठी खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मेथीमध्ये आढळणारे प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड सारखे घटक केसांची वाढ वाढवतात. यामुळे केसांची लांबी वाढते.

केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून रोखण्यासाठी, नारळाचे तेल आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले हे हर्बल तेल तुमच्या केसांना लावू शकता. केसांची ताकद वाढवण्यासोबतच, ते केसांना अकाली पांढरे होण्यापासून देखील रोखते.

काखेतील काळेपणा कोणत्या कारणांमुळे वाढतो, जाणून घ्या