
झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी कंपनीच्या ग्रुप सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. एटरनलने (झोमॅटोची मूळ कंपनी) एका मोठ्या नेतृत्व बदलाचा भाग म्हणून ही घोषणा केली आहे. शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर दीपिंदर गोयल यांनी राजीनामा दिला आहे आणि अल्बिंदर धिंडसा यांची तात्काळ प्रभावाने एटरनलचे नवीन ग्रुप सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपिंदर गोयल यांनी का दिला राजीनामा?
दीपिंदर गोयल यांनी शेअरहोल्डर्सना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “आज, मी ग्रुप सीईओ पदावरून पायउतार होत आहे आणि शेअरहोल्डर्सच्या मान्यतेच्या अधीन राहून, मी संचालक मंडळावर उपाध्यक्ष म्हणून काम करत राहीन. अल्बिंदर धिंडसा (अल्बी) हे इटरनलचे नवे ग्रुप सीईओ असतील.”
पत्रात ते म्हणाले की, “अलीकडच्या काळात मी काही नवीन कल्पनांकडे आकर्षित झालो आहे, ज्यामध्ये खूप जास्त जोखीम घेणे आणि प्रयोग करणे यांचा समावेश आहे. अशा गोष्टी पब्लिक कंपनीच्या (लिस्टेड कंपनीच्या) चौकटीत बसत नाहीत. त्यामुळे मी ग्रुप सीईओ पद सोडत आहे.”


























































