
दिल्लीतील वायूप्रदूषणाचे संकट प्रचंड वाढले आहे. बुधवारी सकाळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माहितीनुसार, आज सकाळी 7 च्या सुमारास दिल्लीतील वायू गुणवत्ता (एक्यूआय) 341 पर्यंत वर गेले होते. दिल्लीतील संवेदनशील क्षेत्रातील प्रदूषणाचा स्तर सरासरी खूपच वाढल्याचे दिसले. आनंद विहार, अशोक विहारमध्ये एक्यूआय 388 पर्यंत पोहोचला आहे. तर वजीरपूरमध्ये 386 एक्यूआयची नोंद झाली आहे. आरके पूरम, द्वारका सेक्टर, पंजाबी बाग, आयटीओ, चांदनी चौक, बवानातही एक्यूआय वाढला आहे.


























































