
प्रवासी बस कंटनेरला धडकल्याने भीषण अपघाताची घटना आंध्र प्रदेशातील नांद्याल जिल्ह्यात घडली आहे. कंटनरला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोन चालक आणि क्लिनरचा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. बसमध्ये 36 प्रवासी होते. स्थानिक आणि बस क्लिनर यांनी तत्परता दाखवल्याने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र चार प्रवासी गंभीर जखमी तर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
नांद्याल जिल्ह्यातील सिरीवेला मेट्टाजवळ टायर फुटले. यामुळे चालकाचे बसवरी नियंत्रण सुटले आणि बस कंटेनरला धडकली. धडकेनंतर बसला भीषण लागली. बस क्लिनर आणि स्थानिकांनी प्रसंगावधान राखत बसच्या काचा फोडून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. मात्र यात बस चालक, कंटनेरचा चालक आणि क्लिनर या तिघांचा होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.


























































