असं झालं तर… बँकेची एफडी मोडावी लागली…

Losses of Breaking Bank FD Before Maturity & Ways to Avoid It

फिक्स्ड डिपॉझिड (एफडी) हा अजूनही लोकांच्या आवडीच्या गुंतवणूक पर्यायापैकी एक आहे. याचे कारण या स्किमवर गुंतवणूकदारांचा दीर्घ काळापासून विश्वास आहे.

या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतात आणि त्यावर त्यांना खात्रीशीर परतावा मिळतो, पण काही वेळा लोकांना अचानक पैशांची गरज भासते आणि मग एफडी मोडली जाते.

मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडल्याबद्दल बँका तुमच्याकडून दंड आकारतात. अशा परिस्थितीत तुम्हाला जो नफा मिळू शकला असता तो मिळत नाही.

तुम्ही मुदतीपूर्तीपूर्वी एफडी तोडली तर तुम्हाला त्यावरील व्याज मिळणार नाही, जे तुम्हाला एफडी सुरू करताना सांगितले होते. त्यामुळे त्या एफडीचा अपेक्षित असा फायदा होत नाही.

एफडी तोडण्याचे नुकसान टाळण्याचे दोन मार्ग आहेत. शॉर्ट टर्म एफडी घेणे अधिक चांगले होईल. दुसरा मार्ग म्हणजे सर्व पैसे एकाच एफडीमध्ये गुंतवण्याऐवजी अनेक एफडी करा.