
काही जणांना रात्री लवकर झोप लागत नाही. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर कधीतरी डोळा लागतो, पण शांत झोप होत नाही. याचा परिणाम मग दुसऱ्या दिवशीच्या कामावरही होतोच. शिवाय असेच जर रोज होत असेल तर त्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. म्हणूनच रात्री पुरेशी आणि शांत झोप होणे खूप गरजेचे आहे.
- झोपण्याआधी मोबाईलपासून दूर रहा.
- ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास असतो, त्यांनी संध्याकाळी 6 नंतर चहा, कॉफी घेणे टाळायला हवे. कारण त्यामुळे चिंता वाढते आणि त्याचा झोपेवर परिणाम होतो.
- रात्री झोपण्यापूर्वी हळद आणि जायफळ घालून दूध घेतले तरी त्याचा झोपेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो.
























































