
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विकासकामांचा धडाका लावला आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणाऱया ‘कार्यअहवाल’ या पुस्तिकेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ’मातोश्री’ निवासस्थानी झाले.
आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनिल देसाई यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे संकलन अहवालात करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी देसाई यांच्या कामाची पद्धत आणि जनसंपका&चे काwतुक केले. यावेळी शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे आणि भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस दिनेश बोभाटे उपस्थित होते.
अहवालामुळे कामे नागरिकांपर्यंत पोहोचतील!
हा कार्यअहवाल म्हणजे केवळ आकडेवारी नसून, तो सामान्य जनतेचा विश्वास आहे. अहोरात्र कष्ट करणाऱया प्रत्येक शिवसैनिकाचा आणि विभागातील तमाम नागरिकांचे हे यश आहे,’ असे अनिल देसाई यांनी सांगितले. या अहवालामुळे मतदारसंघातील कामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
























































