
ज्या ज्यावेळी हिंदी भाषा आमच्यावर थोपविली, तेवढय़ाच त्वेषाने विरोधदेखील झाला. तामीळनाडूमध्ये हिंदी भाषेला कोणतेही स्थान नाही, अशा शब्दांमध्ये तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी भाषासक्तीला कडाडून विरोध करत कठोर शब्दांमध्ये ठणकावले.
तामीळनाडूमध्ये 1964-65 मधील हिंदीविरोधी आंदोलनात अनेकांनी मातृभाषेसाठी प्राणांची आहुती दिली होती. त्यानिमित्ताने आयोजित तामीळ भाषा शहीद दिवस कार्यक्रमात स्टॅलिन म्हणाले, उपखंडात विविध भाषांचे हक्क आणि ओळखीचे रक्षण करण्यासाठी झालेल्या हिंदीविरोधी आंदोलनाचे तामीळनाडूने नेतृत्व केले. यापुढेही कायम विरोध होईल.




























































