
करोडो चाहत्यांच्या गळय़ातील ताईत बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्याने ‘एक्स’ पोस्ट केली असून यापुढे पार्श्वगायक म्हणून मी कोणतेही नवीन काम घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ‘माझा प्रवास खूपच सुंदर होता. मी आनंदी आहे. आज मी निवृत्ती घेतोय. या प्रवासात तुम्ही मला जे प्रेम दिले त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे,’ अशा भावना अरिजीतने व्यक्त केल्या आहेत.



























































