Ajit Pawar Plane Crash – DGCA कडून विमान अपघाताची चौकशी आणि ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरू

बारामतीमधील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताची डीजीसीएकडून (Directorate General of Civil Aviation) चौकशी करण्यात येत आहे. या संदर्भात डीजीसीएकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. बारामतीमधील विमान अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. ही चौकशी डीजीसीए आणि एएआयभीद्वारे केली जाईल, असे डीजीसीएचे प्रमुख फैझ अहमद किडवई यांनी म्हटले आहे. सकाळी ८-४० ते ८-५० वाजताच्या दरम्यान विमानाला अपघात झाल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

विमान अपघातानंतर DGCA/AAIB (Aircraft Accident Investigation Bureau) टीम अपघातस्थळी पोहोचली आहे. घटनास्थळी विमानाच्या अवशेषांचे विश्लेषण आणि ब्लॅक बॉक्स शोधण्यात येत आहे. या अपघाताचा प्राथमिक अहवाल पुढील काही दिवसांत येऊ शकतो. तसेच अंतिम अहवाल नियमानुसार ६ ते १२ महिन्यांत येईल. तसेच गरज पडल्यास या प्रकरणी विमान निर्माता कंपनी बम्बार्डिअर आणि इंजिन तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. विमानात अजित पवारांसोबत दोनजण आणि दोन क्रू मेंबर्स होते. आणि या अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे, असे डीजीसीएने म्हटले आहे.

विमानाच्या फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR – Black Box) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) ची तपासणी केली जाईल. विमानाच्या मेंटेनन्स लॉग, तांत्रिक स्थिती आणि पूर्व इतिहास, हवामान परिस्थिती, पायलट कम्युनिकेशन, ATC रेकॉर्ड्स आणि लँडिंग अप्रोच तसेच विमानाच्या सिस्टम्स (इंजिन, कंट्रोल, लँडिंग गियर) मधील संभाव्य तांत्रिक बिघाड यावर डीजीसीएच्या चौकशीत फोकस असणार आहे.