Chhattisgarh Encounter – विजापूरच्या जंगलात चकमक सुरू, सुरक्षा दलाकडून 3 ते 4 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीगडच्या विजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन ते चार नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळते. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. दोन्ही बाजूकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे.

विजापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील जीदपल्लीच्या जंगलात नक्षलवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने जंगलात शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान सशस्त्र नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सकाळी 7 वाजल्यापासून गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एक एके-47 देखील जप्त केली आहे.

इल्मिडी पोलिस स्टेशन परिसरात प्रत्येकी 20 किलो वजनाचे दोन आयईडी बॉम्ब जप्त करण्यात आले. लंकापल्ली कच्च्या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हे बॉम्ब पेरले होते. डीआरजी कर्मचारी, सीएफ कर्मचारी आणि बीडीएस टीमच्या मदतीने हे बॉम्ब घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.