
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यांनी निवडून आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका शिवानी परब आणि मानसी जुवाटकर यांचा रविवारी जोगेश्वरी येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. सर्वोदयनगर येथील रहिवाशांतर्फे सत्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 77 मधून शिवानी परब तर प्रभाग क्रमांक 79 मधून मानसी जुवाटकर विजयी झाल्या. दोन्ही नवनिर्वाचित नगरसेविकांच्या सत्कार सोहळय़ाला स्थानिक शिवसेना आमदार बाळा नर, शैलेश परब, मधुकर जुवाटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्वोदय नगर येथील गणेश मैदानात रात्री 8 वाजता हा सत्कार समारंभ पार पडणार आहे.





















































