वसईत पिण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
underground-water-tank

शहरातील नौपाडा परिसरात असलेल्या बारपुल्या नावाच्या चाळीत पिण्याच्या टाकीमध्ये मानवी हाडांचा सापळा आढळून आला आहे. हे अवशेष सापडल्याने वसईत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी हा सापळा ताब्यात घेतला आहे. मानवी कवटी तसेच हातांच्या हाडांचा सांगाडा त्यात असून ही हत्या आहे की अपघात याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.

नौपाडय़ातील चाळ सुमारे 30 वर्षे जुनी असून तेथे 10 ते 15 कुटुंबे राहतात. सध्या चाळीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाण्याची टाकी तोडत असताना आतमध्ये हाडांचा सापळा असल्याचे दिसताच कामगार प्रचंड घाबरले. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला कळवताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक लॅबमध्ये या सापळय़ाची तपासणी केली जाणार असून अहवाल आल्यानंतरच खरी माहिती उघडकीस येणार आहे.