हिंसाचार पीडित मणिपूरमधून एक वर्षांनी उठणार राष्ट्रपती राजवट, युमनाम खेमचंद सिंह होणार नवे मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंसाचाराच्या छायेत असलेल्या आणि राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या मणिपूर राज्याला अखेर नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.

मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली होती, ज्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता साधारण एका वर्षानंतर राज्यात पुन्हा सरकार स्थापन होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५ वाजता भाजप मुख्यालयात मणिपूरमधील भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

कोण आहेत युमनाम खेमचंद सिंह?

युमनम युमनाम सिंह हे मणिपूर भाजपमधील एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी यापूर्वी मणिपूर विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. तसेच एन. बिरेन सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.