राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… रोहित पवारांचा पोस्टमधील वाक्याने उडवली खळबळ, रोख कुणाकडे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी अपघाताच्या घटनेवरून काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबीय राजकीय क्षेत्रात लगेचच सक्रीय झाले असले तरी मनातील जखमा कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे रोज X वर पोस्ट करत आहेत. बुधवारी देखील त्यांनी केलेल्या पोस्टनंतर ती पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ‘आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय…’ अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. सध्याच्या राजकीय संस्कृतीवर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ च्या माध्यमातून ताशेरे ओढले आहेत.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत जळजळीत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, ‘आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!’

राजकीय वर्तुळात चर्चा

रोहित पवार यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे, एकमेकांवर होणारे वैयक्तिक हल्ले आणि राजकीय स्वार्थासाठी होणारी चढाओढ या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांतील विविध घटनांमुळे राज्यासह देशातील राजकीय पातळी खालावल्याची चर्चा सामान्यांमध्येही सुरू आहे.

छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष… या रोहित पवार यांच्या विधानाचा रोख नक्की कुणाकडे आहे? राजकारणात छक्के-पंजे करणारे लोक नक्की कोण आहेत? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Politics is Disgusting”: Rohit Pawar’s Viral Post on Value of Human Life

NCP SP MLA Rohit Pawar expressed his anger over current political situation, stating that human life has no value in today’s politics. Read his full viral X post details.