
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी बारामती येथील विमान अपघातात मृत्यू पावलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी शिवसेना तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी माळी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर उपस्थित होते.
































































