काळा निळा पडलेला चेहरा, गालावर रक्त अन् नाकात कापूस; बेन स्टोक्सने शेअर केला धक्कादायक फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

इंग्लडचा कसोटीचा कर्णधार बेन स्टोक्सला सराव सत्रादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. बेन स्टोक्सने त्याचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्या फोटोत बेनचा एक डोळा काना निळा पडलेला दिसत आहे. चेहऱ्यावर गंभीर जखम असून नाकात कापसाचा बोळा घातलेला या फोटोत दिसत असून या दुखापतीमुळे बेन स्टोक्स वर्ल्ड कप खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.