
केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनमध्ये गुरुवारी राजधानी दिल्लीत एक बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. या कराराद्वारे प्रस्तावित फ्रंटियर नागालँड टेरिटरीला कार्यकारी, कायदेशीर आणि आर्थिक स्वायत्तता देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. या करारानंतर अमित शहा यांनी नागालँडचा पारंपरिक वेष परिधान करून कॅमेऱयांना पोझ दिली.



























































