Under 19 World Cup Final – टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडवर कौतुकाचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने इंग्लंडचा दारूण पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक पटकावला आहे. टीम इंडियाच्या या षटकारानंतर संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) –
अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शब्दात शिवसेनेकडून टीम इंडियाचे कौतुक करण्य़ात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी –
हिंदुस्थानचे क्रिकेट टॅलेंट चमकले. विश्वचषक पुन्हा आपल्या घरी आणला त्यासाठी मला आपल्या अंडर 19 टीमचा अभिमान वाटतोय. आपला संघ संपूर्ण मालिकेदरम्यान चांगला खेळला. यांचा हा विजय अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल.

सचिन तेंडुलकर –
चॅम्पियन्स! या तरुण मुलांचा व त्यांनी खेळलेल्या निर्भिड खेळाचा खूप अभिमान वाटतोय. संपूर्ण संघाचे, त्यांच्या प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफचे खूप खूप अभिनंदन. हा क्षण एन्जॉय करा. जेव्हा तुमच्याकडे सूर्यवंशी असतो तेव्हा असा धमका अपेक्षितच होता. वैभवचे खूप अभिनंदन.

विराट कोहली –
अंडर 19 टीमच्या या विजयासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन. या वयोगटातील खेळातली आपली पकड ही कायम आहे व ती अशीच कायम राहिल. संपूर्ण टीमचे अभिनंदन

नीता अंबानी –
ब्लू जर्सीतील आपल्या खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन. आयसीसी अंडर-19 विश्वचषक सहाव्या वेळेस जिंकून तुम्ही इतिहास रचला आहे. ही खरोखरच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद कामगिरी आहे. तुम्ही दाखवलेले धैर्य, शिस्त आणि तुमच्या वयापेक्षा कितीतरी पटीने मोठा आत्मविश्‍वास अद्वितीय आहे.

मिताली राज –
सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होणाऱ्या टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचे अभिनंदन. वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूत 175 धावा करत जबरदस्त खेळ दाखवला व विजयासाठी एक भक्कम पाया रोवला.