
नव्या वर्षात नागरिकांचा ईएमआय कमी होईल, अशी अपेक्षा असताना आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे ईएमआय सध्या तरी बदलणार नाही. आरबीआयच्या पतधोरण समितीची या वर्षातील पहिली बैठक 4 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत पार पडली. समितीने घेतलेल्या निर्णयांची आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान, आज बाजार उघडताच मोठी पडझड झाली होती. सेन्सेक्स 82,927 या निचांकी पातळीवरुन 650 पेक्षा जास्त अंकांनी सावरला.






























































