
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यातील महिला संत म्हणजे संत निर्मळा. संत निर्मळा यांनी पंढरीच्या विठूरायाची भक्ती केली व भक्तिमार्गाचा पाय रोवला. 14 व्या शतकातील संत निर्मळा कवयित्री देखील होत्या. संत निर्मळा या संत चोखा मेळा यांच्या बहीण होत्या. स्थानिक उच्चवर्णियांच्या वर्चस्व आणि परकीयांचे आाक्रमण यामुळे तेराव्या शतकात अनके वर्गाला सोसावे लागले कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांच्या आहारी मोठय़ा प्रमाणात गेलेल्या समाजातील अनेक वर्गांना या प्रथांमधून बाहेर पडण्याचा मार्ग संतांनी दाखवला व नामस्मरणाचा मार्ग दाखवला. समाजाला सोप्या नामसाधनेचा पर्याय देण्याचा जो प्रयत्न वारकरी संतांनी केला तसेच या मध्ये संत निर्मळा यांचा वाटा मोठा दिसतो.
नामस्मरणाचे महत्व पटवून देतांना त्या सांगतात की, संसाराचे कोण कोड। नाही मज त्याची चाड। एका नामेंचि विश्वास । दृढ घालोनिया कांस। जेथे न चले काळसत्ता । विठोबाचे नाम गाता। शास्त्रे-पुराणे वदती । नाम तारक म्हणती। संत निर्मळा यांनी अनेक अभंगरचना केल्या. त्यांचे अभंग आजही समजला शिकवण देतात नामस्मरणाचे महत्व पटवून देतात.























































