
दिल्लीत भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम आदमी पक्षाने (AAP) भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या या वर्षपूर्तीला फ्रॉड डे म्हणत साजरा केला आहे. आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला आहे की, भाजपने गेल्या वर्षी ८ फेब्रुवारीला खोटेपणा आणि चोरी करून निवडणूक जिंकली होती.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सौरभ भारद्वाज भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, “आज ८ फेब्रुवारी आहे. एका वर्षापूर्वी भाजपने दिल्लीत फसवणूक करून निवडणूक जिंकली होती. हे सरकार फसवणुकीच्या प्रयोगशाळेतून जन्माला आले आहे.” अरविंद केजरीवाल यांच्या विधानसभा मतदारसंघात जिथे आधी १ लाख ४८ हजार मतदार होते, तिथे केवळ १ लाख ६ हजार मतदार उरले. भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी सुमारे ४२ हजार मते कापली, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, भाजप या दिवसाला ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणून साजरा करत आहे. २७ वर्षांनंतर दिल्लीत सत्ता स्थापन केल्याबद्दल भाजप आपली कामगिरी लोकांसमोर मांडत असतानाच, ‘आप’ने मात्र याला लोकशाहीची फसवणूक म्हटले आहे.
फर्ज़ीवाड़ा दिवस की शुभकामनाएं
Happy Fraud Day 🎈
आज से एक साल पहले भाजपा चुनाव में फर्ज़ीवाड़ा करके जीती थी। pic.twitter.com/Aznute9rFL
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) February 8, 2026
























































