मोदींच्या राजीनाम्यासाठी युवक काँग्रेस आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्याने कल्याण येथे युवक काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. सध्या जगभर एपस्टीन फाईल्समुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने भाजपची कोंडी केली आहे. या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी कल्याण पश्चिममध्ये युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठय़ा संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात एक कार्यकर्ता तात्या विंचूच्या वेशभूषेत आला होता. सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेत होता.