
लाखो नियमित प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलसेवेचा कायापालट होणार आहे. नजिकच्या काळात उपनगरी रेल्वे मार्गावर अत्याधुनिक वंदे मेट्रो एसी लोकल येणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमआरव्हीसी) विविध वैशिष्टय़े असलेल्या अत्याधुनिक 238 रेकसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
एमयूटीपी टप्पा-3 आणि 3-अ अंतर्गत अत्याधुनिक रेकचे 2,856 डबे प्रवासी सेवेत दाखल केले जाणार आहेत. प्रकल्पात पुढील 35 वर्षांसाठी नव्या लोकलच्या देखभालीचा मुद्दादेखील निकाली काढला आहे. वंदे मेट्रोचा लूक आकर्षक पद्धतीने डिझाईन केलेला आहे. इंटर-कार गँगवे असणाऱ्या वॉक-थ्रू ट्रेन्समुळे प्रवाशांच्या गर्दीचे चांगले व्यवस्थापन होणार आहे. ट्रेनमध्ये उभे राहण्यासाठी प्रशस्त जागा तसेच एर्गोनॉमिक मॉडय़ुलर कुशन असलेल्या आसनांमध्ये दिव्यांग व्यक्ती आणि व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी विशेष जागा आहे. त्याचबरोबर मोठय़ा खिडक्यांमुळे प्रवाशांना रेल्वे स्थानके आणि बाहेरील परिसर सहजरीत्या पाहता येणे शक्य होणार आहे.
अडीच वर्षांत नवीन ट्रेन दाखल
लोकलसेवेचा कायापालट करण्यासाठी एमआरव्हीसीने नवीन रेक उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. त्यानुसार कराराच्या मंजुरीनंतर पुढील अडीच वर्षांत पहिल्या प्रोटोटाइप ट्रेन दाखल होणार आहेत. सर्व 238 गाडय़ा मुंबईत दाखल होण्यासाठी चार ते सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
लोकल 12, 15 आणि 18 डब्यांच्या असणार
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत लोकल प्रवासाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गर्दीच्या नियोजनासाठी 12, 15 आणि 18 डब्यांच्या रेकचा समावेश असणार आहे. कर्जत येथील भिवपुरी (मध्य रेल्वे) आणि पालघर येथील वानगाव (पश्चिम रेल्वे) येथे दोन नवीन मेगा देखभाल डेपो उभारण्यात येणार आहेत.
बेलासिस उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील बेलासिस उड्डाणपुलाचे काम विक्रमी वेळेत म्हणजे अवघे 15 महिने आणि सहा दिवसांत पूर्ण झाले. मात्र सध्या हा उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबई सेंट्रल, ग्रँटरोड परिसरातील वाहतूक काsंडीची समस्या दूर होणार आहे. पालिकेने ‘प्रजासत्ताक दिनी’ पूल खुला करण्याचे नियोजन केले होते. तो मुहूर्त टळल्याने नव्या तारखेची प्रतीक्षा केली जात

























































