
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव हिंदुस्थानात चांगलाच वाढतो आहे. सोने कधीच दीड लाखांच्या पुढे गेले आहे. चांदीचा भावही सोन्यापेक्षा जास्त गतीने वाढतो आहे. शेजारी देश असलेल्या पाकिस्तानातही वेगळी परिस्थिती नाही. पाकिस्तानची कमकुवत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई याचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. हे दोन्ही धातू चांगलेच भाव खात आहेत. त्यामुळे पाकिस्तानात सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. पाकिस्तानात एक तोळा सोन्याचा भाव तब्बल 5,15,000 ते 5,19,000 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला आहे. पाकिस्तानात 22 कॅरेट सोन्याचा भाव 40,534 ते 41,257 पाकिस्तानी रुपये प्रतिग्रॅमवर पोहोचला आहे. कराची, लाहोर, इस्लामाबाद यासारख्या बडय़ा शहरांत सोन्याचा भाव साधारण सारखाच आहे.































































