
ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्यासारखे काही नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. छातीत थोडासा कफ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. अभिजित लोढा यांनी सांगितले की, पवार यांच्यावर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. पुढील दोन ते तीन तासांत त्यांचे अहवाल मिळणार असून सध्या त्यांना खासगी कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “खासदार शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील एक ते दोन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू राहतील. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.” तसेच कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

























































