
मोदी सरकारसाठी अडचणीचे ठरलेले माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे अप्रकाशित पुस्तक ‘पह्र स्टार्स ऑफ डेस्टिनी’ बाजारात मिळत असल्याची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. नरवणे यांच्या पुस्तकावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे.

























































