कडवई, कसबा, साडवलीत शिवसेनेचा गुलाल, दिग्गजांना धक्का देत जिल्हा परिषदेत बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यामधून शिवसेनेच्या तीन शिलेदारांनी जिल्हा परिषद गटात विजयाचा गुलाल उधळला. दिग्गज मंडळींचा पराभव करत शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. कडवई गटातून संतोष थेराडे, कसबा गटातून विशाखा कुवळेकर तर साडवली जिल्हा परिषद गटातून नेहा माने यांनी हा मान मिळवला आहे.

कडवई जिल्हा परिषद गटात भाजपा उमेदवार विनोद म्हस्के यांनी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र या जिल्हा परिषद गटात पूर्वीपासून प्रतिनिधित्व करणारे संतोष थेराडे यांनी विकास कामांच्या जोरावर भाजप उमेदवाराला धोबीपछाड दिला. कसबा जिल्हा परिषद गटात. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शिंदे गटाच्या उमेदवार रचना महाडिक यांचा शिवसेनेच्या विशाखा कुवळेकर यांनी दणदणीत पराभव करत निष्ठावंतांची शिवसेना कसबा जिल्हा परिषद गटात अभेद्य असल्याचे दाखवून दिले.

साडवली जिल्हा परिषद गटात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नेहा रवींद्र माने यांनाच पुन्हा एकदा शिवसेनेने उमेदवारी दिली होती. नेहा माने यांचा साडवली जिल्हा परिषद गटात असणारा संपर्क, त्यांनी आजवर केलेली विकास कामे तसेच राज्यमंत्री असणाऱया पती रवींद्र माने यांनी संगमेश्वर तालुक्याचा विकासाच्या दृष्टीने केलेला कायापालट याचा फायदा नेहा माने यांना झाला. साडवली जिल्हा परिषद गटातील मतदारदेखील शिवसेनेशी प्रामाणिक असल्याचे आज नेहा रवींद्र माने यांनी मिळवलेल्या विजयावरून स्पष्ट झाले आहे.