
राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही रुग्णालयात पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
प्रकृती बिघडल्यामुळे पवार यांना सोमवारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. या तपासण्यांचे अहवालही नॉर्मल आले आहेत.































































