Adani Defamation Case: पत्रकारावर कारवाई, रवी नायर यांना एक वर्षाची कोठडी आणि दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
adani-group

अदानी समूहाची मुख्य कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ने (AEL) दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात पत्रकार रवी नायर यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. गांधीनगर जिल्ह्यातील माणसा येथील दंडाधिकारी न्यायालयाने नायर यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावत दंडही ठोठावला आहे.

एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तानुसार रवी नायर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर अदानी समूहाबद्दल काही ट्विट्स केले होते. या ट्विट्समध्ये करण्यात आलेले दावे धादांत खोटे आणि बदनामीकारक असल्याचा आरोप अदानी समूहाने केला होता. या ट्विट्समुळे कंपनीची आणि संपूर्ण अदानी समूहाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, असा दावा एईएलने न्यायालयात केला होता.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रवी नायर यांना फौजदारी मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवून न्यायालयाने त्यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि आर्थिक दंड सुनावला. या निकालावर वृत्ताचे काम सुरू असेपर्यंत नायर यांची कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांमध्ये आलेली नव्हती.