
उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार दोन दिवसांच्या दिल्ली दौऱयावर आहेत. या दौऱयात त्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यावेळी मोदी यांनी एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांना दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दोऱयानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचल्या. त्यानंतर आज त्यांनी प्रथम पंतप्रधान मोदी व नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी मोदींशी जवळपास 40 मिनिटे तर तर शहांशी अर्ध्या तासाहून अधिक वेळ संवाद साधला. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासह इतर राजकीय मुद्दय़ांवर चर्चा केली. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ व जय पवार हे दोन्ही सुपुत्र उपस्थित होते.




























































