अंधेरीत 11 हजार किलो साखर वाटप, शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त अनोखा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेच्या वतीने अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात 11 हजार किलो साखर गरजू व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोफत वितरित करण्यात आली.

विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या पुढाकारातून शिवसेना शाखा क्र. 59 अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास शाखाप्रमुख शरद प्रभू, शाखा संघटक रोहिणी माळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. “शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना अभिवादन म्हणून असे उपक्रम सातत्याने सुरू राहतील,’’ असे संजय मानाजी कदम यांनी सांगितले.