
अमेरिकेसोबत वाढलेला तणाव आणि युव्रेन विरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशिया मोठा डिजिटल स्ट्राइक करण्याची तयारी करत आहे. रशियामध्ये व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्याची तयारी केली जात आहे. व्हॉट्सअॅपने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करून यासंबंधी माहिती दिली आहे.
रशियन सरकारने सरकारी अॅप मॅक्सचा वापर रशियन जनतेने करावा यासाठी व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, असे म्हटले आहे. रशिया 100 मिलियन म्हेजच 10 कोटी लोकांचे व्हॉट्सअॅप बंद करण्याची तयारी करत आहे, असेही व्हॉट्सअॅपने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


























































