
तुम्ही कारचे कर्ज पूर्णपणे फेडले असेल आणि तुमच्या गाडीच्या आरसी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) वर बँक किंवा फायनान्सरचे नाव असेल, तर काळजी करू नका..
सरकारने ‘हायपोथेकशन टर्मिनेशन’ म्हणजेच कर्जाची नोंद हटवण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. हे काम आरटीओमध्ये न जाता मोबाईलवर घरबसल्या करू शकता.
परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट VAHAN (vahan.parivahan.gov.in) भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. कागदपत्रे अपलोड करावी.
बँक किंवा फायनान्सरकडून मिळालेले ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी), आरटीओ फॉर्म 35, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनाची मूळ आरसी ही कागदपत्रे लागतील.
कार विकायची असेल, मालकी हक्क हस्तांतरित करायचा असेल, तर हायपोथेकशन हटवणे आवश्यक आहे. यामुळे आरसीवरून बँकेचा दावा संपुष्टात येतो.

























































