आयफोनचा हट्ट; विद्यार्थ्याने जीवन संपवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागडा आयफोन खरेदी करण्यासाठी अनेकांनी किडनी विकण्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. आता आयफोनच्या हट्टापायी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बेळगाव जिह्यात निपाणीजवळच्या सिदनाळ येथे ही घटना घडली आहे. रुतेश विजय नलवडे (16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुतेश याने घरच्यांकडे आयफोनसाठी हट्ट धरला होता. यावेळी, तू अजून दहावीत शिकत आहेस, पुढे घेऊन देऊ, असे कुटुंबियांनी त्याला समजावले. शनिवारी सायंकाळी घरात कोणी नसल्याचे पाहत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.