एलॉन मस्क यांचा ‘एक्स’ हा सोशल मीडिया आज जवळपास दोन तास ठप्प पडला होता. जगभरातील युझर्स कोणतेही फीड पाहू शकत नव्हते तसेच कोणतीही पोस्टदेखील करता येत नव्हती. वेबसाईट तसेच ऍप, दोन्ही ठिकाणी सेवा बंद पडल्याच्या तक्रारी लाखो युझर्सनी केल्या. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात ‘एक्स’ची सेवा दुसऱयांदा ठप्प पडली आहे. साधारणतः सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ‘एक्स’ ठप्प पडले. ते रात्री सुमारे साडे आठ वाजताच्या आसपास सुरू झाले.



























































