हिंदुस्थानातच तयार होणार राफेलचा ‘हॅमर’; 60 किमीची रेंज, लक्ष्याचा अचूक वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि फ्रान्स दरम्यान नुकताच 114 राफेल विमानांच्या खरेदीचा करार झाला. त्यानंतर आता उभय देशांमध्ये आणखी एक मोठा संरक्षण करार होणार आहे. हिंदुस्थानने राफेलमध्ये वापरल्या जाणाऱया ‘हॅमर’ क्षेपणास्त्रासाठी करार केला आहे. विशेष म्हणजे, हे क्षेपणास्त्र आता हिंदुस्थानातच तयार केले जाणार आहे. यासाठी लवकरच एक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.

17 फेब्रुवारी रोजी, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री पॅथरीन वॉट्रिन या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते बंगळुरूमध्ये सहाव्या हिंदुस्थान-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादात सहभागी होतील. या बैठकीत विद्यमान संरक्षण करार आणखी 10 वर्षांसाठी वाढवता येऊ शकतो. याव्यतिरिक्त, हॅमर क्षेपणास्त्राच्या उत्पादनाबाबत एक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही सैन्यांमधील प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त लष्करी सराव वाढतील.

  • वैशिष्टय़े काय

    ‘हॅमर’ म्हणजे हातोडा. ज्याप्रमाणे हातोडय़ाच्या घावाने पृष्ठभाग सपाट होतो, त्याचप्रमाणे ‘हॅमर’ त्याचे काम अचूक करेल.

    हॅमर एक स्मार्ट, अचूक बॉम्ब आहे जो हवेतून जमिनीवर अचूक प्रहार करतो. त्याची रेंज अंदाजे 60 ते 70 किलोमीटर आहे.

    त्याचे वजन अंदाजे 330 किलो आहे.

    स्थिर आणि गतिमान दोन्ही लक्ष्यांवर मारा करू शकते.

    हे आधुनिक नेव्हिगेशन सिस्टमने सुसज्ज आहे. लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.

    राफेल विमानात सहा 250 किलो वजनाची हॅमर क्षेपणास्त्रs बसवता येतात, जी एकाच वेळी सहा वेगवेगळ्या लक्ष्यांना लक्ष्य करू शकतात.