
अभिनेता राजपाल यादव याला दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला आज दुपारी 3 वाजेपर्यंत डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात 1.5 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. ते जमा केल्यानंतरच जामीन मंजूर केला तसेच त्याच्या शिक्षेला 18 मार्चपर्यंत स्थगिती दिली. राजपाल यादव याला चेक बाउंस प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली होती.


























































