
दागिने हरवल्यास घाबरून न जाता शांत डोक्याने शोधाशोध करावी. सर्वप्रथम तुम्ही गेलेल्या ठिकाणी दागिन्यांचा शोध घ्या. सर्वांत आधी घरापासून सुरुवात करा.
घरातील कपाटे, पिशव्या तपासा. तुम्ही शेवटचे दागिने पुठे घातले होते आणि नंतर पुठे पुठे गेलात याची आठवण करून त्या जागी शोध घ्या.
तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जा. मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचा संशय असल्यास ‘लॉस्ट रिपोर्ट’ किंवा तक्रार नोंदवा.
हॉटेल, रेस्टॉरंट किंवा मॉलमध्ये दागिने हरवले असल्यास तेथील रिसेप्शन/सुरक्षारक्षकांशी संपर्प साधा. त्यांची मदत घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न करा.
दुकानदाराला किंवा सापडलेल्या व्यक्तीला स्वतःहून पैसे देऊन दागिने परत मागू नका. तुम्ही तक्रार केलेली असल्याने जर दागिने सापडले तरी पोलिसांना कळवा.

























































