शिखर बँक घोटाळा; ईओडब्ल्यूचा तपासाला पूर्णविराम, रोहित पवारांचा दावा, ईडी आग्रही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिखर बँकेत घोटाळा झाल्याच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) स्पष्ट केले आहे. तरीदेखील ईडीला अजून खोलात जाऊन तपास करायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केला.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आमदार रोहित पवार यांनी सत्र न्यायालयात हजेरी लावली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. शिखर बँक घोटाळ्याच्या तपासात आम्हाला काहीही सापडले नाही. आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे, असे ईओडब्ल्यूने ईडीला सांगितले आहे. मात्र याचा खोलवर तपास करायचा आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. आम्ही लढतोय आणि जिंकणार याचा विश्वास आम्हाला आहे, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.

केंद्रातून आदेश

या प्रकरणात कदाचित केंद्रातून आदेश देण्यात आले आहेत. अधिकारी बदलण्याची वेळ आली तरी चालेल, पण यात जे जे कोणी नेते आहेत त्यांना सोडू नका, असे केंद्र सरकारने यंत्रणेला सांगितले आहे. अजितदादांचे नाव यात आहे. सत्तेत असलेल्यांना पण हे सोडत नाही. याचा अर्थ केंद्र व राज्य सरकारमध्ये विरोधाभास आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

MSC Bank Scam: EOW Submits Closure Report; Rohit Pawar Slams ED’s Persistence

Rohit Pawar claims EOW found no evidence in the MSC Bank scam, but alleges the ED is being pressured by the Centre to continue the investigation.