शिवद्रोही प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची पोलिसांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prashant koratkar indrajit sawant

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील आणि त्यांचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन एक वर्ष होईल पण अजूनही या गुन्ह्याचा तपास का पूर्ण झालेला नाही ? असा प्रश्न विचारणारी कायदेशीर नोटीस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ॲड.असीम सरोदे,ॲड श्रीया आवले,ॲड. योगेश सावंत,ॲड. हेमा काटकर आणि ॲड.सकलेन मुजावर यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना पाठविली आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन कॉल करून त्यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, मुख्यमंत्री ब्राम्हण आहे- आमचा आहे अशी तंबी भरणे आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील, त्यांचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य करणे याबाबत समाजमाध्यमांसह शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.त्यामुळे पोलिसांना कोरटकर विरोधात तक्रार दाखल करणे भाग पडले. अखेर दि.१ मार्च २०२५ रोजी शिवद्रोही प्रशांत कोरटकर विरोधात इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे एफआयआर क्रमांक १५४/२०२५ नोंद करण्यात आला.प्रशांत कोरटकर आणि त्याला वाचविण्यासाठी सरकारमधील एक लॉबी व कट्टरवादी विचारधारा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती.पण एक वर्ष होत आले तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली की नाही याबाबत स्पष्टता नसल्याने पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवून विचारणा केल्याचे इंद्रजित सावंत म्हणाले. न्यायालयाने जामीन देतांना प्रशांत कोरटकरवर ज्या अटी घातल्या त्यांचे पालन होत आहे का?, प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रात आहे कि दुबईत पळून गेला आहे? असे प्रश्न सुद्धा इंद्रजित सावंत यांनी नोटीस मधून उपस्थित केले आहेत.

पोलीस जर प्रामाणिक व पारदर्शक भूमिकेतून तपास करण्याची त्यांची कायदेशीर जबाबदारी पाळत नसतील तर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल असे इंद्रजित सावंत यांचे वकील ॲड.असीम सरोदे म्हणाले.

Indrajit Sawant Issues Legal Notice to Kolhapur Police Over Prashant Koratkar Case Delay

Historian Indrajit Sawant, through Adv. Asim Sarode, has sent a legal notice to Kolhapur Police questioning the delay in the investigation against Prashant Koratkar for his derogatory remarks against Chhatrapati Shivaji Maharaj and Rajmata Jijau.