कलबुर्गीत सेप्टीक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील कलबुर्गी येथे सेप्टीक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. रतन होळकर आणि शिवकुमार नंदुरकर अशी त्या दोन कामगारांची नावे असून ते दोघेही इंदिरानगरचे रहिवासी होते.

रतन व शिवकुमार हे दोघे मंगळवारी मदरासनाहल्ली भागातील सेप्टीक टँक साफ करत होते. त्यावेळी रतन सेप्टीक टँकमध्ये पडला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी शिवकुमार हा टँकमध्ये उतरला मात्र दोघांचाही टँकमध्ये गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून त्याचा तपास सुरू आहे.