
बुधवारी संध्याकाळी वेस्ट पाम बीचला जाणाऱ्या ‘जेटब्लू’ (JetBlue) विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. या बिघाडामुळे विमानातील कॉकपिटमध्ये धूर पसरल्याने वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे परत उतरवले.
पोर्ट ऑथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, जेटब्लूचे फ्लाइट क्रमांक ५४३ ने बुधवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:४३ वाजता नेवार्क विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच इंजिन निकामी झाल्याचे लक्षात आले. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन स्लाइडचा (Slides) वापर करण्यात आला.
विमान कंपनीची भूमिका
या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया देताना ‘जेटब्लू’ने म्हटले की, ‘विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आम्ही फेडरल अथॉरिटीजला सहकार्य करत आहोत.’
विमानतळ वाहतुकीवर परिणाम
या आपत्कालीन घटनेमुळे नेवार्क विमानतळावरील विमान वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. टॅक्सी-वे वरील विमान सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर संध्याकाळी ७:०० वाजता विमानतळाचे कामकाज पूर्ववत झाले. या गोंधळामुळे विमानांच्या उड्डाणांना साधारण ९० मिनिटे, तर आगमनासाठी (Arrivals) दोन तासांहून अधिक विलंब झाला.
सध्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
jetblue flight 543 emergency landing at newark airport due to engine failure
jetblue flight heading to west palm beach returned to newark airport after engine failure and smoke in cockpit. passengers evacuated safely via slides.
























































