
भाजपने ऐनवेळी नारायण चौधरी यांची महापौरपदाची उमेदवारी बदलून स्नेहा पाटील यांना दिल्यामुळे भाजपमध्ये प्रचंड खदखद आहे. नारायण चौधरी यांनी भाजपवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाले आहे. सत्तेसाठी अनेक पक्ष फोडणाऱ्या भाजपचाच एक गट महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ हातात घेण्याची शक्यता असून भिवंडीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
आगपाखड करत सेक्युलर गटासोबत स्नेहा पाटील नारायण चौधरी भिवंडी पालिका सभागृहात कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. ९० पैकी काँग्रेस ३०, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार १२, भाजप २२, शिंदे गट १२, समाजवादी पार्टी ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, अपक्ष १ असे बलाबल आहे. महापौरपदाची निवडणूक २० फेब्रुवारी आहे. भाजपने नगरसेवक नारायण चौधरी यांना महापौरपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते. यानंतर नारायण चौधरी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत महापौरपदासाठीचा अर्जदेखील दाखल केला. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीला आज वेगळेच वळण मिळाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने आपला उमेदवार बदलला. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना महापौरपदाचा उमेदवार बदलला. त्यामुळे शहर अध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यासंदर्भातील लेखी पत्र भाजप शहराध्यक्षांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिले.
होय मी नाराज
भाजपमध्ये अचानक अशी काय सुत्रे फिरली की त्यामुळे माझी महापौरपदाची उमेदवारी पक्षाने मागे घेतली. माझी उमेदवारी रद्द केल्याने मी भाजपवर नाराज असल्याचे नारायण चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे महापौर निवडणुकीत मी सेक्युलर पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
असा आहे फॉर्म्युला
नव्या समीकरणानुसार भाजपचे नाराज नारायण चौधरी महापौर, काँग्रेसचे तारिक मोमिन उपमहापौरपदाचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. तर सोबत असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला स्थायी समिती सभापतीपद देण्याचा फॉर्म्युला असल्याची माहिती समजते






























































